Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?
आपल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आता गुगलची मदत घेतो. गुगलवर आपल्याला हवा तो प्रश्न विचारला की त्याचे असंख्य उत्तर आपल्यासमोर येतात. आता व्हॉट्सअपने हीच सुविधा मेटा एआयच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे.
मुंबई
Updated:How to use Meta AI in Whatsapp : व्हॉट्सअपची मूळ कंपनी असलेली मेटाने आपल्या सर्व सोशल मिडिया प्लाटफॉर्मवर एआय फिचर्स उपलब्ध केला आहे. यामुळे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर एआय चॅटबॉट उपलब्ध झाला आहे. या एआय चॅटबॉटमुळे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर मिळणार आहेत.
व्हॉट्सअप हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं चॅटिंग प्लॅटफॉर्म आहे. या ॲपचे कोट्यवधी वापरकर्ते जगभरात आहेत. व्हॉट्सअपच्या अनेक फिचर्समुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या आहेत. व्हिडिओ कॉल, वॉईस कॉल, डॉक्युमेंट, पेमेंटसारख्या सुविधा व्हॉट्सअपवर सुरू झाल्याने वापरकर्त्यांना इतर ॲप्सची फार कमी गरज लागते.